भुसावळ प्रतिनिधी
भुसावळ येथे जेतवन बुध्द विहार डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर भुसावळ या ठिकाणी आषाढ पौर्णिमे पासून "भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म" या ग्रथांचे वाचन सुरु होते.वाचकस्वर सुमंगल तथा रविंद्र अहिरे जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा पूर्व यांचा होता.सतत तीन महिने त्यांनी विहारात धम्म ग्रथांचे वाचन केले होते.सदर धम्म ग्रंथाची वाचन समाप्ती काल २६ आक्टोंबर २०२६ ला सोमवारी आश्विन पौर्णिमेला सकाळी १०.०० वा.कार्यक्रम सुरु होऊन १२.३० पर्यत अखंड सुरु होता. प्रथम तथागत भगवान बुद्ध व प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस महिला मंडळाच्या माध्यमातून पुष्प अर्पण करून दिप..धूप प्रज्वलन.. अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीलाच संपूर्ण सूत्र पठण परित्राणपाठ घेण्यात आला. त्यामध्ये सर्वच उपासक उपासिका सहभागी झालेल्या होत्या. त्यानंतर ग्रंथाचे वाचन करते सुमंगल तथा रविंद्रअहिरे. यांनी "भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म"या ग्रथांचे वाचन शेवटचे पान पूर्ण करुन ग्रंथ वाचनाची सांगता केली. त्यानंतर ग्रंथ वाचक सुमंगल तथा रविंद्र अहिरे यांचा सत्कार आदरणीय लक्ष्मीताई मकासरे व महिला मंडळ यांच्या कडुन शाल व पुष्पगुच्छ शुभ्र वस्त्र आर्थिक दान देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे आद. यशवंत सहस्त्रबुद्धे यांचा टोपी/टावेल व शुभ्र वस्त्र देऊन तसेच असित तायडे यांना आर्थिक दान देऊन सत्कार करण्यात आला. आद.के.ए.गवई आद. एम.आर.धनविजय आद.राजकुणाल ओव्हाळ आद.मनुरे साहेब.आद.हरीचंद्र घोडेस्वार मुरलीधर कांबळे.युवराज इंगळे यांच्या हस्ते शाल व धम्मदान देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर वैयक्तिक सत्कारही करण्यात आला. आयु.नि. ताराबाई मोरे यांनी शाल गुच्छ आणि पेढे देऊन स्वागत केले. आयु.ति आशालताताई घोडेस्वार,मोरे ताई, साळवे ताई, निकम ताई, इंगळे ताई, भालेराव ताई, व सर्वच महिला मंडळ यांनी शाल गुच्छ शुभ्र वस्त्र (रेडीमेड ड्रेस) देवून सत्कार केला.आद.सविताताई इंगळे यांनी शाल गुच्छ देवून सत्कार केला..आर्थिक दान दिले..यादी फारच मोठी होईल.म्हणून सर्वच नावे आली नाही त्याबद्दल क्षमस्व ... ☸️ आद.आशालता ताई घोडेस्वार, पवार ताई(कविवर्य सारंगदादा पवार यांच्या अर्धांगिनी) आद.युवराज इंगळे, आद.अशोक भालेराव ,आद.पाळण यांनी मनोगत मांडले. त्याचप्रमाणे रोज विहारात येणारे असित तायडे व बाल उपासक यांनी मोलाचे सहकार्य केलेले आहेत. दररोज विहारात उपासिका उपासक व लहान बालक/ बालिका यांची संख्या वाढतच गेली. तीन महिन्याच्या कालावधीत प्रत्येक दिवशी खीर दान /लाडू/ जिलेबी/ बालुशाही /पेढे इत्यादीचे दान/आर्थिक दान रोज विहारात केले गेले. सतत तीन महिने मंगलमय वातावरणात सदरचा तीन महिन्याचा कालावधी संपन्न झाला.आज सांगता झाली. रोज विहारात येणाऱ्यांची प्रत्येकाचे नावें घेतली तर यादी वाढत जाईल व पोस्टही वाढेल त्यामुळे नावे घेण्यात आली नाही, ज्यांची नावे आली नाही. त्यांची या ठिकाणी क्षमा मागतो गेल्या तीन महिन्यात प्रत्येकाने आपल्या यथाशक्ती धम्मदान देऊन जेतवन बुद्ध विहार डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी नवीन सुरुवात केलेली आहे. भोजन दान करण्यात आले. विहारात सर्वांनी धम्मदान दिलेलेआहे. याबाबत सर्व दानदात्यांचे मी वैयक्तिक मनःपूर्वक आभार मानतो. आपण सर्वांनी तीन महिने विहारात येऊन जे "वेळेचे दान" दिलं ते महत्त्वाचं त्यामुळे आपल्या सर्वांच्या प्रति पुन्हा एकवार मंगल कामना व्यक्त करुन या ठिकाणी "कृतज्ञता भाव" व्यक्त करतो.
