रावेर दि. (दीपस्तंभ न्यूज नेटवर्क )
पोलीस भरतीत त्यांने यश संपादन केले. त्याच्या या यशासाठी रावेर पंचक्रोशीत त्याचे कौतुक होत आहे. श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय रावेर येथील चेअरमन श्री. हेमंतशेठ नाईक प्राचार्य डॉ. पी. व्ही. दलाल ,क्रीडा समन्वयक एस. यु. पाटील ,उपप्राचार्य सूर्यवंशी ,सिनेट सदस्य अनिल पाटील क्रीडा संचालक उमेश पाटील, डॉ.जी. आर. ढेंबरे, प्रा धापसे , प्रा धनले सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी सर्व क्रीडा प्रेमी यांनी अभिनंदन केले. मनोगत प्रा.उमेश पाटील- आसिफला गेले सहा वर्षापासून मैदानावर बघत असून त्याची जिद्द व संघर्ष अप्रतीम आहे. महाविद्यालयाकडून खेळताना अनेक स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत. एक उत्कृष्ट खेळाडूचे सर्व गुण आसिफ मध्ये असल्यामुळे अनेक अडचणीना तो समर्थपणे सामोरा गेला. त्याचे हे यश येणाऱ्या सर्व खेळाडूना प्रेरणा देईल.
असिफने आपल्या मनोगतामध्ये क्रीडा संचालक प्रा. उमेश पाटील यांनी आपल्याला मार्गदर्शन केल्याचे सांगितले. श्री. व्ही.एस. नाईक महाविद्यालय यांनी आपल्याला वेगवेगळ्या सुविधा प्राप्त करून दिल्या त्यामुळेच मी हे यश प्राप्त करू शकलो. निकालाचा हा क्षण माझ्यासाठी आणि माझ्या आईवडिलांसाठी खुप आनंदाचा आहे. हा क्षण त्यांच्चा आनंदात मला दिसत आहे. कारण हा क्षण खुप कठीन काळातून, परिश्रम घेवुन त्यांच्या वाट्याला आला म्हणून मी माझ्या या यशाचे क्षेय त्यांना देत आहे तसेच मला या क्षेत्रात ज्यांची खरी साथ मिळाली ते म्हणजे आमच्या कॉलेजचे क्रीडा, संचालक आणि माझे गुरुवर्य प्राध्यापक श्री उमेश पाटील सर यांचे मला वेळोवळी अनमोल मार्गदर्शन मिळाले, तसेच महाराष्ट्र पोलीस (जळगाव पोलीस) कार्यरत असलेले इस्माइल (दादा) तडवी यांचेही मला योग्य मार्गदर्शन दिले गेल्या 5-ते 6 वर्ष झाली मी मी श्री व्हि. एस. नाईक कॉलेजच्या मैदानावर सराव करत असून मला कॉलेज जीमखाना विभागाकडून योग्य साहीत्य व मार्गदर्शन मिळाले. माझा परीवार माझे गुरूवर्य यांनां मी श्रेय समर्पित करतो असे मत मांडले.

