रावेर प्रतिनिधी
रावेर येथील ग्राम महसूल अधिकारी, कर्तव्यदक्ष व मनमिळावू व्यक्तिमत्व स्वप्नील परदेशी यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकाली निधन झाले, ही बातमी अत्यंत वेदनादायी आहे.
त्यांच्या जाण्याने महसूल विभागाने एक प्रामाणिक, जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी गमावला आहे. त्यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करत जनतेचा विश्वास संपादन केला होता.
रावेर येथील ग्राम महसूल अधिकारी स्वप्निल परदेशी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकाली निधन झाले त्यामुळे रावेर शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
