*पाल येथे वनउद्यानात तिकीटघराचे उद्घाटन*

पाल प्रतिनिधी अफजलखान

आज रोजी पाल येथील वनउद्यानात तिकीट घराचे उद्घाटन वन समितीचे अध्यक्ष कामिल तडवी यांचे हस्ते करण्यात आले . यावेळी तडवी यांनी गार्डन मध्ये येणारे पर्यटक यांना समिती मार्फत सोयी पुरवण्याचे आस्वासन दिले यामुळे पाल वनउद्यानात पर्यटकांची संख्या वाढेल . तसेच समितीचे इतर सदस्यांनी उद्यानात असलेली कमतरता अडचणी माळी लोकांची कमतरता पिण्याच्या पाण्याची सोय. 'शौचालय , रस्ते, शोभेची झाडे तसेच लहान मुलांकरीता बालोद्यान याची सुधारणा व्हावी करीता मागणी करण्यात आली असता वनधिकारी वनक्षेत्रपाल श्रीकांत काळे यांनी उद्यानातील विविध प्रश्न लवकर मार्गी लागतील असे यावेळी बोलले .

उद्घाटन प्रसंगी वनक्षेत्रपाल श्रीकांत काळे वनपाल वैशाली कुलकर्णी वनरक्षक मुकेश तडवी वन समितीचे अध्यक्ष कामील तडवी इतर ग्रा.प. सदस्य व इतर वनमजुर हजर होते.