*पाल येथे ईद मिलाद ची भव्य मिरवणूक*

 


पाल प्रतिनिधी अफजल खान

पाल प्रतिनिधी  दिनांक 26 ऑगस्ट रोजी ईद मिलाद निमित्ताने पाल येथे मस्जिद जवळून सकाळी 8 वाजता धार्मिक गायणाने मिरवणूक ला सुरुवात करण्यात आली दरवर्षी प्रमाणे यंदाही ईदमिलाद मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली .तसेच रस्त्यात ठिक ठिकाणी अल्पोहार म्हणून गोड खाद्यपदार्थ फळे शितपेय मिरवणूकित वाटण्यात आले . सर्व धार्मिक लहान मोठे मुस्लीम बांधवांनी नविन कपडे परिधान करून सुंगधीत अत्तर लावल्याने सुंगध परीसरात दरवडत होता .

         मस्जिद परिसर ते पुढील चौकापर्यंत रोषणाई करण्यात आली होती ठिकठिकाणी झेंडे लावण्यात आल्याने परिसराला वेगळेच स्वरूप आल्याने लहान मोठे सर्व जण आनंदी होते . मिरवणूक पुर्ण परिसरातून आल्याने सकाळी 10 वाजता मस्जिद परिसरात दाखल होवून कुराण पठणाने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी सुन्नी शाही मस्जिदचे  ईमाम गुलाम हुसेन ' मौलाना शरिफूलहक , मौलाना हाफीजफय्याज यांनी विश्वशांती करिता प्रार्थना केली .

       तसेच मस्जिद कमेटीचे सदस्य व पाल पोलीस स्टेशनचे पोऊनि मनोज महाजन . हवलदार जगदीश पाटील . ईश्वर चव्हाण ' ईश्माईल तडवी यातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता