*पाल दौऱ्यात विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची सातपुडा सफारीची पाहणी*

पाल (प्रतिनिधी): अफजल खान

पाल येथे नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शुक्रवारी पाल येथील सातपुडा जंगल सफारीला भेट देत परिसरातील पर्यटन सुविधा व वन व्यवस्थापनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पाल पासून 7 किमी अंतरावर असलेल्या सफारी परिसरात वृक्षारोपण करून पर्यटन विकास आणि पर्यावरण संवर्धनाबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

यानंतर त्यांनी पाल ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला. स्थानिक नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार रुग्णालयासाठी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत लवकरच ती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, उपवनसंरक्षक सौरीश सहाय, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण तसेच वन विभागातील अधिकारी सहा.उपवनसंरक्षक समाधान पाटील प्रादेशिक वनक्षेत्रपाल श्रीकांत काळे वन्यजिव वनक्षेत्रपाल शितल नगराळे इतर कर्मचारी उपस्थित होते.