रावेर प्रतिनिधी : विजय एस अवसरमल
भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा रावेरच्या कार्यकारिणीच्या पुनर्गठनासाठी शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता सावदा रोड वरील *तक्षशिला बुध्द विहार* येथे कार्यकारिणी निवड सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही सभा भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. के. वाय. सुरवाडे (गुरुजी), जिल्हाध्यक्ष सुमंगल तथा रविंद्र अहिरे (गुरुजी), जिल्हा सरचिटणीस सुशीलकुमार हिवाळे (गुरुजी) जिल्हा कोषाध्यक्ष प्रा. डॉ संजीव साळवे, जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र वानखेडे वसंत दादा लोखंडे जिल्हा सचिव भिमराव पवार,संघरत्न दामोदरे. तसेच जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असून, यावेळी रावेर तालुका शाखेची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात येणार आहे.
या महत्त्वपूर्ण सभेस रावेर तालुक्यातील सर्व माजी श्रामणेर, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, बौद्ध उपासक तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभेची शोभा वाढवावी, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक तथा रावेर तालुका प्रभारी विजय शामराव अवसरमल, तालुका अध्यक्ष विजय भोसले, तालुका सरचिटणीस इंजि.राजेश सिद्धार्थ सुरदास यांच्या वतीने करण्यात आले आहे.