दीपस्तंभ न्यूज संपादक राजेंद्र अटकाळे
रावेर दि 9 प्रतिनिधी रावेर नगरपालिका हद्दीतील चार खुले भूखंड नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अशा पद्धतीने खेलो इंडिया या मोहिमेअंतर्गत विकसित करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी सांगितले यासंदर्भात नगरपालिका प्रशासन व नगराध्यक्ष यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा देखील केलेली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी नुकतीच रावेर नगरपालिका नगराध्यक्ष व मुख्याधिकारी तसेच काही नगरसेवक यांची बैठक घेऊन याबाबत माहिती जाणून घेतली व विकास कामां संदर्भात मार्गदर्शन देखील केले यावेळी माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन मुख्याधिकारी अविनाश गांगोडे,लखन महाजन, दीपक नगरे योगेश महाजन यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत त्यांनी मुख्याधिकारी यांच्याकडून रावेर शहरातील नगरपालिका मालकीचे खुले भूखंड यांची माहिती घेऊन या शहराच्या चारही बाजूला चार खोली भूखंड नागरिकांच्या आरोग्याला बळकटीकरणासाठी उपयोगी ठरतील यात खेलो इंडिया या मोहिमेंतर्गत पुरुष व महिलांसाठी खुल्या पद्धतीची व्यायामाची साहित्य म्हणजेच ग्रीन जिम तसेच बास्केटबॉल बॅडमिंटन पोर्ट व इतर काही खेळांची साहित्य देखील या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत त्यामुळे शहरातील महिला पुरुष तसेच विद्यार्थी यांना व्यायामासाठी तसेच त्यांच्या खेळांना चालना देण्यासाठी ही भूलेखन भूखंड उपयोगी पडणार आहे. पद्माकर महाजन यांनी रावेर शहरातील खुल्या भूखंडाविषयी माहिती देत रावेर शहरात नुकतेच प्रशासनामार्फत काढण्यात येत असलेल्या अतिक्रमणाविषयी माहिती दिली. शहरातून जाणाऱ्या या रस्त्याचे दुतर्फा झाडे मध्ये दुभाजक व पथदिवे यांचीही व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली. रावेर शहरातून जाणाऱ्या रस्त्यांविषयी चर्चा करून नवीन विश्रामगृह ते स्वस्तिक टॉकीज यादरम्यान काँक्रिटीकरण करण्याबाबतचे सुसविले यात मंत्री श्रीमती खडसे यांनी सदर रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात येऊन रस्ते सुशोभीकरण कसे करता येतील याविषयी चर्चा केली तर रावेर नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील काही सौंदर्यशील व विकसित शहरातील नगरपालिका यांचा अभ्यास दौरा करावा अशाही सूचना दिल्या आहेत
