रावेर प्रतिनिधी
रावेर : श्री व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेर येथील कु. मानसी संदीप पाटील हिने नागपूर येथे आयोजित राज्यस्तरीय सीनियर सपाक टकारा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकाविले. तिच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे.
कु. मानसी पाटील ही एस.वाय.बी.एस्सी. वर्गाची विद्यार्थिनी असून तिने जिद्द, मेहनत व सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर ही कामगिरी केली. तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय हेमंतशेठ नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, क्रीडा संचालक डॉ. उमेश पाटील, उपप्राचार्य प्रा. एस. यू. पाटील, डॉ. संदीप धापसे, क्रीडा समिती सदस्य प्रा. चतुर गाडे व प्रा. वळवी यांनी तिचे अभिनंदन केले.
यावेळी मानसीचे वडील श्री संदीप पाटील, आजोबा पुंजुसिंग पाटील तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी मानसीला पुष्पगुच्छ देऊन तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मानसीने भविष्यात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करावे, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
