*जागतिक डॉक्टर डे निमित्ताने रावेर पोलीस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स मंडळींना पुष्पगुच्छ देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या*
रावेर प्रतिनिधी
जागतिक डॉक्टर डे निमित्ताने रावेर पोलीस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स मंडळींना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जेष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर एस आर पाटील, डॉक्टर अनंत अकोले यांच्यासह शहरातील नामांकित डॉक्टर माऊली हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप पाटील ओम सर्जिकल हॉस्पिटलचे डॉक्टर मिलिंद वानखेडे जानकी हॉस्पिटल डॉक्टर दिगंबर पाटील श्रीपाद हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश पाटील सुश्रुत हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश महाजन डॉक्टर चंद्रकांत पाटील डॉक्टर राहुल अहिरराव रावेर एक्स रे सेंटरचे डॉक्टर ताराचंद सावळेनिलेश चौधरी हे उपस्थित होते.
तर रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी उपस्थित सर्व डॉक्टरांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला व डॉक्टर डेनिमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन दीपक नगरे यांनी केले तरी आभार पोलीस उप निरीक्षक मनोज महाजन यांनी मानले


