यावल प्रतिनिधी
फैजपूर येथे दि.15/5/2026 रोजी सम्राट बुद्ध विहार फैजपूर ता. यावल येथे भारतीय बौद्ध महासभा यावल तालुका नवीन कार्यकारिणीचे पुनर्गठन निवड करण्यात आली.सर्वात प्रथम तथागत भगवान बुद्ध व भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बौद्धाचार्य महाले गुरुजी यांनी सामुदायिक बुद्ध वंदना घेतली. व सभेला सुरुवात झाली.
आलेल्या मान्यवरांचे शाल /पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सभेचे अध्यक्ष स्थानी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष आद. सुमंगल तथा रविंद्र अहिरे यांनी स्वीकारले. जिल्हा कोषाध्यक्ष- डॉ .प्रा. संजीव साळवे, महाराष्ट्र राज्य पर्यटन सचिव डॉ. के. वाय. सुरवाडे,समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष लेफ्टनंट कर्नल-रमेश साळवे, जि. संस्कार सचिव आद.संघरत्न दामोदर, आद.विजय अवसरमल गुरुजी, जि. संघटक तसेच आयु.नी वसुंधराताई मेढे,पारमिता महिला मंडळ अध्यक्ष रेखाताई शैलेश मेंढे यांच्या उपस्थितीत कार्य करण्याची कार्यकारणी निवड करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा यावल तालुका कार्यकारिणीचे सर्वच पदे जाहिर करण्यात आले त्यात अध्यक्ष बी. डी. महाले यांची निवड करण्यात आली.तसेच यावल तालुका उपाध्यक्ष- आद. विष्णू मेश्राम, उपाध्यक्ष पर्यटन प्रचार आद. भागवत पटाईत, उपाध्यक्ष संरक्षण विभाग एस एस डी- आद.ज्ञानेश्वर अडकमोल, हिशोब तपासणीस आद.विलास तायडे,कार्यालयीन आद.सचिन चेतन केदारे, आद.महेंद्र भालेराव,संगीत भालेराव,विलास सपकाळे, वैभव तायडे,संरक्षण सचिव बबन धोंडू तायडे,हरी आमोदकर,देविदास साळुंखे,रोशन केदारे,रुद्रा खंदारे,शरद तायडे यांची निवड करण्यात आली. सभेसाठी धम्म उपासिका सुमन दिलीप मेढे,मालताबाई प्रकाश मेढे,रेखा आकाश मेढे,चंद्रकला सुपडू मेढे,यांचे सहकार्य लाभल सभेची सांगता आभार मानून सरणत्तय घेऊन झाली.*

