रावेर प्रतिनिधि
रावेर तालुव्यातील भोकरी येथील एक दिवसीय लक्षणिक उपोष्ण करण्यात आले, भोकरी येथील गट नं १५ सरकारी जागा असुन सदरील जागेवर ३०ते ४० गरीब जनता अतिक्रमण करुन राहात आहे, मात्र अघाप सदरील जागा ही त्यांच्या नावा वर झालेली नाही, वारंवार ग्रामपंचायत पंचायत समिति जि प जळगाव यांच्या कडे लेखी अर्ज देऊन सुधा काहीच उपयोग झाला नाही,अशा विविध मागणया करीता आज दि ३०/३/२०२६ रोजी भोकरी येथे ग्रामपंचायत कार्यालय समोरिल एक दिवसीय लक्षणिक उपोष्ण संविधान आर्मी चे संघटक व तोफ जगन भाऊ सोनोवणे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर तालुका अध्यक्ष अशोक भाऊ अटकळे यांनी लाभार्थीला सोबत घेऊन लक्षणिक उपोष्ण केले आहे,या उपोष्णाची दखल शासन प्रशासन यांनी घावी अशी मागणी करण्यात आली आहे, या प्रसंगी बाबुअली तडवी, गडडु हैदर तडवी, फिरोज तडवी , दगडु गंभीर तडवी, सुखना तडवी, आदि लाभार्थी मोठया संख्याने उपस्थित होते, उपोष्णस्थाळी संविधान आर्मी चे प्रदेश संघटक मा हरिषभाई सुरवाडे, सतीष भाई सांगदिवे, उत्तर महाराष्ट्र चे अध्यक्ष एड दिपक तायडे, यांनी भेट दिली, या लक्षणिक उपोष्णाला गावातील उत्तम प्रतिसाद मिळाला आहे,
