*रावेर पोलिस स्टेशन व्दारे चालविलेल्या कोंबीग ऑपरेशन तसेच नाकाबंदी मध्ये मिळुन आले दोन अटटल मो. सायकल चोर*

 


रावेर पोलिस स्टेशन येथे दि. २३-०३-२०२६ रोजी गुरंन १२३/२०२६ मा. न्या. संहीता कलम 303 (२) प्रमाणे मो.सा. चोरीचा गुन्हा दाखल होता.

       सदर गुन्हयात फिर्यादी अब्दुल रफीक अब्दुल कादर वय ५२ वर्ष रा. नागझीरी वाडा रावेर हे दि. २३-०३-२०२६ रोजी दुपारी रावेर शहरातील लतिफ हॉल येथे नातेवाईकाच्या लग्नसमारंभात गेले होते. लग्न समारंभआटोपुन ते गाडी घेण्यास गेले असता त्यांना त्यांची काळया रंगावी होन्डा कंपणीवी यूनिकॉन МН-19-DW4895 ही जागेवर मिळुन आली नाही. सदर वाहनाबाबत त्यांनी आजुबाजुला विवारपुस केली असता त्यांना काही एक माहीती मिळुन न आल्याने त्यांनी वाहन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्यावे समजल्याने रावेर पो.स्टे.ला गुन्हा दाखल होता.

       सदर गुन्हयाच्या एकंदर तपासात रावेर शहरात लावलेल्या संपर्ण ९५ कॅमे-यांचे फुटेज तपासण्यात आले परंतु आरोपीतांबाबत काही एक माहीती मिळून येत नव्हती.दि. २३/०३/२०२६ रोजी रात्री मा. पोलिस अधिक्षक सो यांच्या आदेशाप्रमाणे रावेर शहरात कोंींग ऑपरेशन, नाकाबंदी वी मोहीम राबवण्यात आलेली होती. मा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रावेर पोलिस स्टेशन मार्फत नाकाबंदीची कार्यवाही चालु असतांना दोन संशयीत इसम हे वाहनासह मिळुन आले होते त्यांचे कडे सदर वाहनांची कागदपत्रांची मागणी केली असता ते उडवाउडवीचे उतरे देत असल्याने त्यांचे कडे कसुन चौकशी करण्यात आली असता सदर वे वाहन हे त्यांनी दुपारी लतिफ हॉल, रावेर येथुन चोरी केले असल्याचे कबुल केले त्यांचे जवळ अजुन एक HF DELUX कंपणीवी विना नंबर प्लेटची मोटार सायकल मिळुन आलेली असुन त्याबाबत सखोल तपास चालु आहे.

        आरोपीतांचे नांव ०१) आमिर खान अजमल खान जुनेद वय १९ स. खर्णी पुरा ता. यावल जि. जळगांव ०२) रोहीत अशोक बिन्हाडे वय १८ रा. सिध्दार्थ नगर यावल ता. यावल जि. जळगांव हस्तगत मुददेमाल :- ०१) ६४,०००/- रुपये किमतीवी होन्हा कंपणीची युनिकॉन मोटार सायकल ०२) ५०,०००/- रुपये किमतीची एक HF DELUX मोटार सायकल विना नंबर प्लेट.

         रावेर पोलिस स्टेशन अंतर्गत चालविलेल्या कॉवींग ऑपरेशन दरम्यान ०४ जुगार अड्डयांवर छापे टाकण्यात आलेले असुन त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ च्या कलम १२ (अ) प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच 03 इसम हे सार्वजनिक जागी गांज्याचे सेवन करतांना आढळून आल्याने त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य अधिनीयम १९८५ प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे. ०२ इसम हे सार्वजनिक जागेवर गावठी दारुची चोरटी विक्री करतांना आढळुन आल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ ई प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच ०२ इसम हे चोरी करण्याच्या उददेशाने संशयीत रित्या फिरत असल्याने त्यांच्यायवर महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १२२ प्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्यात आलेली आहे.

        सदर कार्यवाही ही मा. डॉ. श्री महेश्वर रेडडी सो पोलिस अधिक्षक जळगांव, मा. श्री अशोक नखाते सो अप्पर पो. अधिक्षक जळगांव विभाग, मा.श्री अनिल बडगुजर पोलिस उपअधिक्षक फैजपुर विभाग, यांच्या मार्गदर्शनाने पोलिस स्टेशन रावेर मधील पो.नि.डॉ विशाल जयस्वाल, पो.उप. निरीक्षक सुनिल मोरे, पो.उप. निरीक्षक तुषार पाटील, गुन्हे शोध पथकातील पो.ना. कल्पेश आमोदकर, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, विशाल पाटील, सुकेश तडवी, गजानन बोने, संभाजी बिजागरे, मुकेश सोनवणे, तथागत सपकाळे, यांनी केली आहे.