*पाल येथील व्यापारी यांचे अवैध गोडाऊन मध्ये धाडी टाकून धावडा, सलाई, कड प्रजातीचा एकूण 7500 किलो अंदाजित रक्कम 15 लाख रुपये किमतीचा डिंक जप्त*

 


पाल प्रतिनिधी अफजल खान 

पाल येथे काल दि. 25/3/26 रोजी पाल वनक्षेत्रातील गारबर्डी  परिमडळातील कक्ष क्रमांक 32 मध्ये अवैधरित्या डिंक संकलन आणि वाहतूक करताना आरोपी नामे गणदास  गबू डुडवे -38,अमित सुजाण मोरे -21,सावन रणजित मोरे -24 सर्व राहणार मेंढागड, खरगोन, हेमराज होरपाल चव्हाण-22 रा. मांडवखेडा खरगोन  हे मिळून आले. त्यांचे कडून 110 किलो  धावडा डिंक जप्त करण्यात आले. पुढील चौकशीत पाल येथील व्यापारी यांचे अवैध गोडाऊन मध्ये धाडी टाकून धावडा, सलाई, कड  प्रजातीचा एकूण 7500 किलो अंदाजित रक्कम 15 लाख रुपये किमतीचा डिंक जप्त करण्यात आला. तसेच या कारवाईत शाईन कंपनीची गाडी क्र. MP10ZA8140, हिरो होंडा स्प्लेंडर Mh19N-5308 वाहन जप्त करण्यात आले.  भारतीय वन अधिनियम 1927, वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये कारवाई करण्यात आली.सदर  कारवाई  म उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सहा वन संरक्षक सत्यजित निकत यांचे मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांच्या पथकाने केली. यात वनपाल संभाजी सूर्यवंशी, मोहसीन तडवी,रणधीर काटे, संजय बारेला, जगदीश बारेला, राजमल बारेला, सकीना तडवी, धनाबाई भादले, सविता बारेला, दीपक बारेला, मुकेश तडवी,आकाश बारेला, पो. कॉ. जगदीश पाटील, पो कॉ. ईश्वर चव्हाण यांनी केली. रावेर येथील पोलीस निरीक्षक  डॉ. विशाल जयस्वाल यांची विशेष मदत लाभली.