*रावेर तालुक्यात बनावट 7/12 उताऱ्यांचा प्रकार; आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार*

रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यात शासकीय ई-सेवा केंद्रांमार्फत बनावट ७/१२ उतारे तयार करून खोटी लागवड नोंद दाखवून शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात तहसील कार्यालयाकडे लेखी तक्रार  करण्यात आली असून सखोल चौकशीची मागणी राजकुमार बन्सीलाल खिरवडकर यांनी दाखल केलेली आहे.

      जळगाव जिल्ह्यात १३३ व्यापारी यांनी १ कोटी ५८ लक्ष ८५ हजार ८३७ रुपये शासनाची फसवणूक केली असल्याची चौकशी करून स्पष्ट झाल्याचे या प्रकरणी व्यापारी यांचेवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे निदेश हे मा. जिल्हाधिकारी सो जळगाव यांनी दिले असता त्यात १ कोटी ५८ लक्ष ८५ हजार ८३७रुपये यांची शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले असल्याने त्यात मौजे रावेर ता. रावेर येथील ३१ जामनेर १४ मुक्ताईनगर ५९ चोपडा १४ शेंदुर्णी १५ असे एकूण १३३ व्यापारी यांचा समावेश असल्याचे माहिती समोर आलेली आहे याबाबत वृत्तपत्रे व समाजमाध्यमांवर वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

       सदरची ज्वारी खरेदी विक्री करणे कामी शेतकरी नोंदणी ही प्रत्येक तालुक्यातील शेतकीसंघ या एजेन्सीने नोंदणी केली असून नोंदणी करतेवेळी शेतकरी यांचे कडून ७/१२ उतारे आधारकार्ड, खेळनफा बाबत करारनामे दाखल केलेले आहे

         सदरचे ७/१२ उतारे हे डीजीटल स्वाक्षरीने असले तरी ते ग्राम महसूल अधिकारी यांचे कडून प्रमाणित करणे व सातबारा उत्तारा खरा व खोटा आहे याबाबत खात्री करणे बंधनकारक होते व आहे काही ग्राममहसूल अधिकारी यांनी पिक पाहणी सहाय्यक यांची निवड केलेली आहे, व त्यांचे मार्फत पिक पेरे हे ग्राममहसूल प्रणालीत नोंदवले जातात, सदर ग्राम महसूल अधिकारी / मंडळ अधिकारी यांनी Tab द्वारे DSC ने मान्यता दिल्या नंतर ७/१२ उतारे यावर नोंद घेण्यात येते त्यामुळे या संदर्भात पिक पाहणी सहाय्यक, तलाठी व मंडळ अधिकारी हे सुद्धा दोषी असू शकतात ! त्यामुळे महाशय जिल्हाधिकारी सो जळगाव यांनी नेमलेल्या समिती मार्फत शेतकरी यांची CSC केंद्रांची चौकशी केलेली आहे. शेतकी संघ एजन्सी आहे त्यामुळे शेतकी संघातील संगणक व संगणक परीचालक, संगणक प्रणाली (app) व त्या संगणकाला जोडणी केलेल्या मान्यता प्राप्त DSC धारक यांची सखोल पडताळणी करावी, तसेच पिक पाहणी सहाय्यक, तलाठी, मंडळ अधिकारी यांची देखील सखोल चौकशी करावी.

        सदरची चौकशी ही आर्थिक गुन्हे शाखा जळगाव व सायबर गुन्हे शाखा जळगाव यांचे करूंग करण्यात यावी. कारण सदरचा गुन्हा हा शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या अनुदानाचा आहे जेणे करून खरे गुन्हेगार कोण हे समोर येतील जसे की चोरी करणारा, चोरीस परावृत्त करणारा, चोरीचा माल घेणारा, हे मुन्यास पात्र असतात. असे झाले तर निरपराध शेतकरी हा कारण नसतांना खोट्याप्रकरणात गोवला जाणार नाही, कारण सदर अपराध हा कोट्यावधी रुपयाचा आहे.

       तरी महाशयास तक्रार की, सदर प्रकरणी गांभीर्यपूर्वक II (स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम - विशेष उपासणी समिती) यांस कडून चौकशी करण्यात यावी व, त्यात दोषी आढळून आलेल्या सर्व अधिकारी / कर्मचारी, CSC केंद्र चालक आणि संबधित शेतकी संघ अद्यावत प्रणालीचे मान्यता प्राप्त DSC धारक या दोषीवर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल व त्यापासून होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी ही माझी नम्र विनंती वरीलप्रमाणे तक्रार असे

सदर निवेदनाच्या प्रती

म. जिल्हाधिकारी सो जळगाव यांना माहिती व पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर.

म. जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव (गुन्हे अन्वेषण शाखा व सायबर शाखा) यांना माहिती व पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर

म. उपविभागीय अधिकारी सो फैजपूर भाग फैजपूर ता. यावल जि. जळगाव यांना माहिती व पुढील आवश्यक त्या कार्यवाही साठी सविनय सादर.

म. उपविभागीय पोलीस अधिकारी सो (DYSP). फैजपूर भाग फैजपूर ता. यावल जि. जळगाव यांना माहिती व पुढील आवश्यक त्या कार्यवाही साठी सविनय सादर.

म. पोलीस निरीक्षक सो पोलीस स्टेशन रावेर ता. रावेर यांना माहिती व पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर