पाल प्रतिनिधी अफजल खान
रावेर तालुक्यातील पिंपरकुंड येथे एका महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दि. ०७ रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे पिंपरकुंड परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
लिलाबाई गादऱ्या बारेला वय ५३, रा. पिंपरकुंड, ता. रावेर, असे मयत महिलेचे नाव आहे. दुपारी त्यांच्या घरातच त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
सदर घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून पुढील चौकशी मा. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.
