*रावेर गुन्हे शोध पथकाने अटल मोटर सायकल चोरांना अटक करुन त्यांचेकडुन तेरा लाख दहा हजार रुपये किमतीच्या ०९ मो. सायकल केल्या हस्तगत*

रावेर प्रतिनिधी

सविस्तर माहिती अशी की,रावेर पोलिस स्टेशन येथे दि. २०-१२-२०२५ रोजी गुरंन ५००/२०२५ भा. न्या. संहीता कलम 303 (२) प्रमाणे मो.सा. (बुलेट) चोरीचा गुन्हा दाखल होता.

       सदर गुन्हयात फिर्यादी हे त्यांच्या नातेवाईकांकडे काही कामानिमीत्त जळगांवहुन रावेर ला चौराहा भागात आले होते त्यांनी त्यांची नविनव असलेली पांढऱ्या रंगाची बुलेट घरा खाली लावुन ते वरील घरात गेले होते. परंतु काही वेळानंर त्यांची बुलेट ही घरा समोरुन अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेल्याचे समजल्याने रावेर पो.स्टे.ला गुन्हा दाखल होता.

       सदर गुन्हयाच्या एकंदर तपासात रावेर शहरात लावलेल्या संपर्ण ९५ कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले परंतु आरोपीतांनी डोक्यात टोपी, व चेहरा झाकलेला असल्याने त्यांची ओळख पटविण्यात अपयश येत होते. परंतु आरोपी हे दुचारी चोरल्यानंतर तीला लोटत नेतात व नंतर पुढे जावुन तीचे लॉक तोडुन चालु करतात अशी त्यांची मोडस होती. व असाच प्रकार काही दिवसांनंतर भुसावळ येथे घडल्याचे रावेर गुन्हे शोध पथकास समजल्याने त्यांनी अधिक तपास केला असता सदर गुन्हयात चोरी केलेली बुलेट ही शिरपुर मध्ये विकली गेली असल्याची खात्री लायक माहीती पो. नि. विशाल जयस्वाल यांना मिळाली सदर माहीती मिळताच त्यांनी रावेर गुन्हे शोध पथकाला आरोपीतां बाबत सखोल तपास करण्याचे निर्देशित केल्याने रावेर गुन्हे शोध पथक हे तपासाचे चक्रे फिरवत चोपडा येथे पोहचले व रावेर शहरातुन चोरुन नेलेली मो. सायकल शिरपुर येथे विकणारे संशयीत हे चोपडा येथे असल्याचे तात्रिक माहीती क्रुन प्राप्त झाले होते. परंतु आरोपीतांना पोलिस हे मागावर असल्याचा सुगावा लागल्याने त्यांनी तेथुन निसटण्याचा प्रयत्न केला परंतु अखेर त्यांचा पाठलाग करत तपास पथक हे त्यांच्या गावी कोरपावली ता. यावल येथे पोहचले व आरोपी क्र. ०१) गौरव दत्तात्रय तायडे वय-२० ०२) तौसिफ तय्यब कुलकर्णी ०३) अब्दुल रहेमान तैय्यब पटेल वय- २० सर्व रा. कोरपावली ता. यावल जि. जळगांव यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपीतांना पोलिसी खाकी दाखवताच त्यांनी ०१ मोटार सायकल चोरीच्या गुन्हयाची कबुली दिली होती परंतु त्यांनी ज्या प्रकारे मो. सायकल चोरी केली होती त्यावरुन ते सराईत असल्याचे जाणवत होते. त्यांना रावेर पोलिस स्टेशन ला आणुन आधिक विचारपुस केली असता ते उडवाउडवीचे उत्तरे देत होते. परंतु पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी त्यांचे तपास कौशल्य वापरुन त्यांना बोलते केले व त्यांनी अखेर पोलिस कस्टडीत असतांना आज पावेतो एकुण ०९ मो. सायकल चोरी केले असल्याचे कबुल केलेआहे. आरोपीतांनी मोटार सायकल चोरतांना सर्व महागडया मोटार सायकलव चोरी केले असल्याचे तपासात दिसुन आले त्यात विषेश म्हणजे रॉयल इंनफिल्ड (बुलेट), आर वन, बर्गमन अशा नविनच लाँच झालेल्या मोटार सायकलींचा समावेश आहे. गुन्हयातील चोरीच्या काही मो. सायकल हया आरोपीतांच्या घरुन काही कोरपावली गावातुन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीतांनी काही मो. सायकल हया एकांत स्थळी सुध्दा लपवुन ठेवल्या होत्या व त्या हस्तगत करणे करीता मोठी तारेवरीची कसरत करावी लागली आहे.

        सदर अटक आरोपी हे केटरिंग च्या कामानिमीत्त गुजरात राज्यात वडोदरा व इतर शहरात जात व रेकी करत असत जी मोटारसायकल त्यांना आवडली ती मोटारसायकल ते चोरुन महाराष्ट्रात आणुन कोरपावली गावातच विकत असल्याचे तपासात आढळुन आले आहे. आरोपीतांकडुन रावेर पोलिस स्टेशन येथील मोटार सायकल जप्त करण्यात आली असुन, एकुन १३,१०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मो. सायकल चे वर्णन खालील प्रमाणे आहे.

*वाहन क्रमाक प्रकार किंमतपुढील प्रमाणे*

1)MH-19-AP-9689 ACTIVA WHITE COLOUR 70,000/-

2) MH-19-EH-7902 SPELONDER+70,000/-

3)GJ-05LZ-8232 R15 1,80,000/-

4) GJ-19-AN-8883 ROYAL ENFILED YELLOW/BLACK COLOUR 2,00,000/-

5) MH-39-R-5555 ROYALE ENFILED COLOUR BLACK 2,00,000/

6) MH-19-CL-2107 ROYALE ENFILED COLOUR WHITE 2,00,000/

7) MH-19-CK-7505 SPLENDOR BLACK/COLOUR SILVER 70,000/-

8) MH-18-BV-8767 SUZUKI BURGMAN WHITE COLOUR 1,20,000/-

9) GJ-19-BC 5151 ROYALE ENFILED BLACK COLOUR 2,00,000/-

 एकूण रक्कम 13,10,000/-

     वरील आरोपीतांना गुन्हयात अटक करुन मा. न्यायालयात हजर केले असता त्यांची 03 दिवस पो. कोठडी प्राप्त झालेली असुन गुन्हयात अजुन त्यांचे साथीदार वाढण्याची शक्यता आहे. आरोपी हे मो. सायकल विकल्यानंतर त्यांचे डुप्लीकेट आर. सी. बुक कोणाच्या तरी मार्फतीने बनवत असावे तरी त्या बाबत पुढील सखोल तपास चालू  आहे.

     सदर कार्यवाही ही मा. डॉ. श्री महेश्वर रेडडी सो पोलिस अधिक्षक जळगांव, मा. श्री अशोक नखाते सो अप्पर पो. अधिक्षक जळगांव विभाग, मा.श्री अनिल बडगुजर सो पोलिस उपअधिक्षक फैजपुर विभाग यांच्या मार्गदर्शनाने पोलिस स्टेशन रावेर मधील पो. नि.डॉ विशाल जयस्वाल, पो.उप. निरीक्षक सुनिल मोरे, गुन्हे शोध पथकातील, पो.हे.कॉ/ ईश्वर चव्हाण, पो.ना. कल्पेश आमोदकर, पो.शि. प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, विशाल पाटील, सुकेश तडवी, विकार शेख, तथागत सपकाळे, रुबाब तडवी, गजानन बोने, यांनी आरोपीताचा शोध घेतला असुन गुन्हयाचा पुढील तपास पो.ना. कल्पेश आमोदकर हे करीत आहेत.