*साखर पुड्याला आले आणि लग्न लावून गेले, बडेजावं न करता आर्थिक बचतीचा संदेश* *कर्जोद येथे मुस्लिम समाजात आदर्श विवाह सोहळा संम्पन्न*

रावेर प्रतिनिधी

आजच्या धकाधीच्या जीवनात सर्वत्र वेळेला महत्व दिले जाते. सध्या महागाईने तोंड वर काढले असून लग्नात दगदागिने किती चढविले जातील याला महत्व दिले जाते. या सर्व गोष्टीला फाटा देत कुठल्याही प्रकारची चर्चा न करता संवादातून एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न रावेर तालुक्यातील कर्जोद येथील पत्रकार शकील शेख,भाऊ अकील शेख,जमील शेख यांच्या परिवाराने मुस्लिम समाजात एक चांगला आदर्श दाखवीत रूढी परंपराना फाटा दिला आहे. 

       याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जोद येथील पत्रकार शकील शेख यांचे लहान बंधू अकील शेख यांच्या कन्या सबिना शेख व रावेरचे शकील शेख इस्माईल यांचा मुलगा जिशान शकील शेख यांचा आज दिनांक ७/२/२०२६ रोजी कर्जोद येथे  साखरपुडा व विवाह निश्चित करण्यासाठी पाहुणे आले होते अचानक पणे साखरपुड्यातच आपण निकाहा म्हणजे लग्न लावून टाकू असा प्रस्ताव वर पक्षाकडून ठेवण्यात आला हा प्रस्ताव समोर येतात वधू पक्षाकडील मंडळी अचंबित झाली समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी,नातेवाईकांनी हुंकार दिल्याने व सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले नेक काम में देरी क्यू असे म्हणत साधेपणाने निकाह पार पाडत मुस्लिम समाजाला आदर्श विवाहाचा संदेश देण्यात आला. 

     *वरा कडील शेख सलीम उर्फ कालू शेठ, आजम शेठ,सत्तार टेलर,अब्दुल हाफीज,इमरान शेख,अकलीम शेख,यांच्यासह त्यांच्या परिवारातील ज्येष्ठ मंडळींनी साखरपुड्याचा कार्यक्रम न करता विवाह म्हणजे निकहा करण्याचा सल्ला दिला. त्यास *वधू* कडील मंडळीं गावातील शाफियोद्दिन शेख,हाजी अनीस शेख,रईस अमीर साहेब,शफी सर,सय्यद असगर, गफ्फार लीडर,सत्तार शैक,शकील शेख,हाजी नईम,हाजी रियाज शेख,एजाज शेख  यांनी सकारात्मक होकार देत महागाईच्या युगात साधेपणाने लग्न करण्यासाठी वेळ व खर्च बचतीचा विचार करत निर्णय घेतला. 

      यावेळी कर्जोद येथील मदिना मशिदचे इमाम सादिक शेख यांनी निकहा लावून खुतबा पठण केला यावेळी रावेर येथील कौशर मस्जिदचे इमाम खलिल सिराजी यांनी  सांगितले की मुस्लिम समाजाने असेच लग्न सोहळे परपडावे व अनावश्यक दिखावा टाळत सामाजिक बांधिलकी जपत रहावे.या विवाह सोहळ्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, समाजात वाढत चाललेल्या खर्चिक विवाह पद्धतीला हा एक सकारात्मक पर्याय ठरला आहे.