*व्यवस्थेशी लढणारे रविदास हे खरे संत होते : दीपध्वज कोसोदे*

 


मुक्ताईनगर(प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रविदास हे खरे संत होते,असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक दीपध्वज कोसोदे यांनी केले.रुईखेडा येथील संत रोहिदास जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

     सुरुवातीस दर्शन लोखंडे,देवांश सावकारे तनवी डांगे, सार्थक लोखंडे,रूद्र सावकारे,हितेश डांगे,या शालेय विद्यार्थ्यांनी संत रोहिदास यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोल डांगे होते.

     संत रोहिदास यांनी आताच्या काही राज्यांना भेटून आपल्या काव्याद्वारे तत्कालीन समाजापुढे प्रश्न उभे केले होते. त्यातून समाज परीवर्तनाची मुहूर्तमेढ रोवल्या गेल्याचे कोसोदे आपल्या भाषणात म्हणाले.

     कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग गुरचळ,विलास लोखंडे, माजी सरपंच सुरेश लोखंडे यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. पवन आणि गोपाळ लोखंडे यांनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन आणि आभार सुनील कळसकर यांनी व्यक्त केले.