*दलाई लामा शांततेचे पुजारी आहेत : जयसिंग वाघ*

 


जळगांव प्रतिनिधी 

जळगाव :- तिबेट देशात असलेल्या बौद्ध धर्माच्या विरोधात चीन येथील कम्युनिस्ट सरकारने सुरू केलेल्या कारवाई विरोधात  दलाई लामा हे १९५० पासून अत्यंत शांततेने व अहिंसेने चीन विरोधात लढा देत आले आहेत मात्र १९५९ मध्ये चीनने अतिशय आक्रमकपणे लष्करी कारवाई करून दलाई लामा यांचा लढा चिरडून टाकला तरी सुद्धा लामांनी हिंसेचा मार्ग न स्वीकारता शांततेने लढा सुरूच ठेवला त्यामुळे ते शांततेचे पुजारी म्हणून जगात मान्य पावले आहेत असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले. 

     जळगाव येथील तिबेटी जनते तर्फे १० डिसेंबर रोजी जी. एस. मैदानावर आयोजित कार्यक्रमात भाषण करताना वाघ बोलत होते.

       जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की, दलाई लामा तिबेट मधील बौद्ध धर्मियांचे आध्यात्मिक गुरू तर आहेतच त्याच बरोबर ते त्यांचे राजकीय गुरू देखील आहेत . तिबेट मध्ये राजकीय लोकशाही अस्तित्वात आणणे हे त्यांचे राजकीय उद्दिष्ट आहे . तिबेट मधील बौद्ध संस्कृती , इतिहास अबादित रहावा , देशात शांतता नांदावी या करिता १९६९ पासून ते जगभरात प्रवास करीत असून विविध देशांच्या प्रमुखांना भेटून त्यांचा लढा समजून सांगत आहेत . त्यांच्या लढ्याची दखल घेऊन त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिनांक १० डिसेंबर १९८९ ला प्रदान करण्यात आला . त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन राजकीय नेत्यांनी शांतता याच तत्वाचा पुरस्कार करावा असे आवाहन वाघ यांनी केले.

     कार्यक्रमाच्या सुरवातीस भगवान बुद्ध , तारादेवीची विश्वपूजा करून त्रिसरण , पंचशील ग्रहण करण्यात आले . 

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोविन होते त्यांनी शांततेच्या पुरस्कारार्थ काही मंत्रोच्चार केले. तसेच दलाई लामांना नोबेल पुरस्कार या दिवशी मिळाला म्हणून तिबेटी लोक हा दिवस आनंदाने साजरा करतात असे सांगितले .

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  दिलिप सपकाळे , शिरींग , प्रास्ताविक फुरबु , स्वागत सेवांग , छाबा यांनी तर आभारप्रदर्शन टेंजिन यांनी तिबेटी भाषेत तर मराठीत कविता सपकाळे यांनी केले .

    प्रा. सरोजिनी लभाने,  तेस्वांग , फुरबा  यांनी  मनोगत व्यक्त केले .

    कार्यक्रमास नंदवोल, चोकी, यांगिनी  ,  फुर्भा ल्हामो, ट्सेविंग योंडन , तेस्तान , चीमे , जम्पा ,  सुनंदा वाघ , गीता सोनवणे , सुमन बैसाणे, सुषमा भालेराव , निखिल रांजनकर , अजय पाटील , छांभा आदींसह स्त्री पुरुष मोठ्या संख्येने हजर होते.

   कार्यक्रमाच्या शेवटी तिबेटी , मराठी गाण्यांवर विविध नृत्य करण्यात आले , मिठाई वाटण्यात आली . अतिशय उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.