*वाचनातूनच सामाजिक क्रांती होऊ शकते : सुभाष वाघ*

रावेर प्रतिनिधी 

रावेर :- वाचन करणे मानवाचे नैतिक कर्तव्य असून वाचनातून आपण ज्ञानाची भूक भागवत असतो , त्यातून मानून मानसिक व बौद्धिक दृष्ट्या अधिक सक्षम तर होतोच होतो त्याच बरोबर तो सामाजिक क्रांती करू शकतो असे विचार भारतीय इतिहास व संस्कृती चे अभ्यासक सुभाष वाघ ( मुंबई ) यांनी व्यक्त केले .

   रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचानायल येथे दिनांक १८ डिसेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना वाघ बोलत होते.

   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष  तथा माजी नगरसेवक जगदीश घेटे होते त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आज काम करण्याची नितांत गरज असून बुद्धिजीवी लोकांनी यात सक्रिय सहभाग घेऊन ही चळवळ अधिक गतिमान करावी असे आवाहन केले .

  प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ ,  फुले , शाहू , आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष तथा पत्रकार राजेंद्र अटकाळे, से. नी. प्राचार्य संतोष गाढे , मनोहर गाढे , ग्रंथपाल निलेश तायडे , दशरथ घेटे, अशोक घेटे,  प्रवीण घेटे आदींसह बहुसंख्य नागरिक हजर होते .

  कार्यक्रमाच्या सुरवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला जयसिंग वाघ यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले . सुभाष वाघ यांनी काही पुस्तकं भेट म्हणून दिले . संस्थेतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .