*पाल येथे अल्पसंखाक हक्क दिवस साजरा*

पाल प्रतिनिधी अफजल खान

पाल येथे दिनांक 18 डिसेंबर रोजी गुरुवारी पाल येथील जनकल्याण बहुउद्देशिय संस्था संचलित नामदार नुरखा तडवी हायस्कुल अल्पसंखाक दर्जा प्राप्त असुन दरवर्षा प्रमाणे यंदाही 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्याक हक्क दिवसाचे चित्र फलक व घोषणांनी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनींनी गावात सकाळी 11 वाजता मिरवणूक काढली तसेच अल्पसंख्याक हक्क दिनाचे महत्व शाळेच्या मुखाध्यापक सय्यद सईद व इतर शिक्षकांनी सांगितले .

       या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष कामिल तडवी ' उपाध्यक्ष अफजल खान शाळेचे मुखाध्यापक सय्यद सईद शिक्षक नवेद शेख' एजाज शेख , आशिफ शेख जुबेर शेख 'वशिम शेख तसेच शिपाई हजर होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ए जाज शेख यांनी केले तर आशिफ शेख यांनी आभार मानले.